Home / समाज / डाभा येथे दर्गा रयबर्शा बाबा उर्सानिमित्त संदल उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन…

डाभा येथे दर्गा रयबर्शा बाबा उर्सानिमित्त संदल उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन…

 

रयबर्शा बाबा दर्ग्यावर संदल सोहळा संपन्न; फकीराभाऊ तडवी यांनी जपली परंपरा..

 

 

डाभा येथे दर्गा रयबर्शा बाबा यांचा उर्सानिमित्त संदल मोठ्या उत्साहात साजरा..

 

छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी _ गोकुळसिंग राजपूत )

 

सोयगाव तालुक्यातील डाभा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही हिंदू-मुस्लिम एकोपा जपत दर्गा रयबर्शा बाबा यांच्या उर्सानिमित्त संदल कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम माजी ग्रामपंचायत सदस्य फकीराभाऊ तडवी यांनी स्वखर्चाने व वडिलोपार्जित परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात आयोजित केला होता.

कार्यक्रमाची सुरुवात मोहम्मद शेख मौलाना यांच्या हस्ते दर्ग्यावर फातिया (पूजा) अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तालुका अध्यक्ष आनंद नेमीचंद जाधव व माजी ग्रामपंचायत सदस्य फकीराभाऊ तडवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमोद कोते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर संदल मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातून शिस्तबद्ध व शांततेत काढण्यात आलेली मिरवणूक दर्ग्यावर पोहोचल्यानंतर चादर व फुलांची अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मिरखा तडवी व शिवदास गोपाळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी सरपंच राहुल हेलोडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बांधव, बालगोपाल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उर्स व संदल कार्यक्रमातून डाभा गावातील सामाजिक सलोखा व धार्मिक सौहार्दाचे सुंदर चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार