Home / व्हिडिओ / थेट / सी ओ साहेब’ असं वेड पांघरून वागणं बरं नव्ह.!

सी ओ साहेब’ असं वेड पांघरून वागणं बरं नव्ह.!

 

 

छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान कोणाच्या आशीर्वादाने? प्रशासनाची निर्लज्ज गप्पी!

 

चिखली/(लोकमहाराष्ट्र न्यूज):- भाग एक मध्ये लोकमहाराष्ट्र न्यूज ने वृत्त प्रकाशित करत खंडाळा चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची ,कौतुकाची ललकारी असलेले अत्यंत देखणे शिलालेख तयार केलेले असून चौकाच्या दर्शनीय स्थळी ही वास्तू तयार करण्यात आली आहे हे जनतेच्या निदर्शनास आणून देत तिथे काय गैरप्रकार होत आहे याबाबत जनमताचा विचार करत लोकमहाराष्ट्र न्यूज टीम ने ‘आस्ते कदम’ मागे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘शौर्याचे शिलालेख आहे..!

गैरजबाबदार ,मरगळ चढलेल्या नगरपालिकेची डोळेझाक….

या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले आणि गाढ झोपेत असलेल्या नगरपालिका प्रशासनाला जाग आणून देण्याच्या प्रयत्न केला,परन्तु एकाच वृत्तात वठणीवर येतील ते नगरपालिका प्रशासन कसले, होईल त्या प्रकारावर डोळेझाक करू करू गेंड्याची कातडी झालेले हे निर्लज्ज अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी आजपर्यंत त्या वास्तू पुढील बेकायदेशीर लागलेले फलक काढले नाही. महाराजांच्या त्या शिलालेखा समोरील लावलेले राजकीय बॅनर हटवण्याबाबत न प कर्मचाऱ्यांना बोलून ही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. ‘सी ओ साहेब’ तोंडावर असं वेड पांघरून बसल्याने अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे त्या वास्तू ची प्रतिष्ठा धुळीस मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

इतिहासाचा अपमान करणारे राजकीय बॅनर दिवसेंदिवस तिथेच झळकत असताना प्रशासन डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा हलत नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शिलालेखा समोर राजकीय जाहिरात बाजीला अभय देणारे न प सी ओ आणि त्यांचे या फलका बाबत हे मौन नेमके कुणाच्या दबावाखाली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. तातडीने बॅनर हटवले नाहीत तर छत्रपतींना मानणारे हजारो मावळे एकत्र येऊन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार