Home / चिखली / ‘आस्ते कदम’ मागे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘शौर्याचे ‘ शिलालेख आहे.!

‘आस्ते कदम’ मागे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘शौर्याचे ‘ शिलालेख आहे.!

गैरजबाबदार ,मरगळ चढलेल्या नगरपालिकेची डोळेझाक….

 

चिखली:- चिखली शहरातील नगरपरिषद निवडणुकाच्या तोफा नुकत्याच थंडावल्या.यामध्ये विविध पक्षाचे उमेदवार निवडून आले आणि शहर भर शुभेच्छा फलक लावण्यास सुरुवात झाली. प्रत्येक विजयी उमेदवाराला शुभेच्छा मिळाव्याही त्यात दुमत नाही. परन्तु बेशिस्तिची हद्द अशी झाली की लाखो रुपये निधी खर्च करून नगरपालिके ने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान(खंडाळा चौक) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वा बद्दल ,शौर्या बद्दल अतिशय देखणे आणि सुंदर शिलालेख बनवले आहे.ज्या शिलालेखातील शब्दरचना वाचल्यास मावळ्यांच्या धमन्यामध्ये रक्त सळसळत त्याच छत्रपती संभाजी महाराज शिलालेखाच्या पुढे नेत्यांचे बॅनर लावले आहे.त्यामुळे हे शिलालेख पुर्णपणे झाकले आहे.विजयाच्या जल्लोषात नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मान सन्मानाचा ही विसर पडला.
त्यात विशेष म्हणजे नगरपालिका अश्या ठिकाणी बॅनर लावण्यास परवानगी देते कशी..? हा प्रश्न आता जनतेला पडला आहे.आता गैरजबाबदार नगरपालिका अजून किती दिवस डोळेझाक करते हे चर्चेचा विषय ठरत आहे.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार