
प्रविण डोंगरदिवे (चिखली) : नुकत्याच संपन्न झालेल्या चिखली नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदी जनतेमधून विजयी झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ नेते, श्रीराम नागरी सहकारी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पंडितराव दादा देशमुख यांचा विश्वरत्न ,महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले “भारताचे संविधान” शाल, पुष्पगुच्छ देऊन सेवा निवृत्त प्राचार्य तथा डॉ.पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पत संस्थेचे उपाध्यक्ष गणेशराव देशमुख तसेच सेवा निवृत्त शिक्षक तथा डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पत संस्थेचे तज्ञ संचालक,साहित्यिक किसन पिसे यांनी श्रीराम नागरी सहकारी पत संस्थेच्या कार्यालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. यावेळी श्रीराम नागरी सहकारी पत संस्थेचे संचालक रामेश्वर पवळ, शेतकरी संघटनेचे नेते समाधान कणखर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.




