Home / Uncategorized / सिद्धपूर सुल्तानपुर येथे अंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य विवेकदासजी शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत विशाल हिंदू संमेलन

सिद्धपूर सुल्तानपुर येथे अंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य विवेकदासजी शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत विशाल हिंदू संमेलन

लोणार (प्रतिनिधी) – हिंदू समाजात एकता, संस्कृतीचे संरक्षण आणि धर्मजागृतीचा संदेश देण्यासाठी सिद्धपूर येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता श्री राम मंदिर, सिद्धपूर (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे पार पडणार आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या संमेलनाचा उद्देश हिंदू समाजाला नवीन दिशा व जागृती देणे हा असून समाजातील सर्व जाती-पंथातील भेदभाव विसरून हिंदू समाजाने एकत्र येऊन संस्कृतीचे रक्षण व सामाजिक विकासासाठी कार्य करावे, हा संदेश देण्यात येणार आहे.

या संमेलनाला युवाचार्य पूज्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. युवाचार्य विवेकदासजी शास्त्री महाराज हे काशी (वाराणसी) येथे वास्तव्यास असून सनातन हिंदू धर्माचे प्रभावी प्रवक्ते म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी “सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा” काढून समाजात धर्मजागृतीचे मोठे कार्य केले आहे. ते अंतरराष्ट्रीय कथावाचक असून हिंदू धर्म, संस्कृती आणि गौमातेच्या संरक्षणासाठी निरंतर कार्यरत आहेत.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री शेखरजी केळकर (प्रांत व्यवसायी कार्य प्रमुख, वाशीम) हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महिला वक्त्या ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई बोबडे (कोयाळी दहातोंडे) यांचेही विचार उपस्थितांना ऐकायला मिळणार आहेत.

कार्यक्रमात महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण होणार आहे. या संमेलनासाठी सिद्धपूर, येमापूर, भानापूर, पार्डी सिसरमाट, चिंचोली बोरे, बडगाव तेजन, बोरखेडी परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार