Home / चिखली / छत्रपती शिवाजी महाराज शूरता पुरस्कार २०२५…

छत्रपती शिवाजी महाराज शूरता पुरस्कार २०२५…

 

नीती आयोगाद्वारे प्रशांत पुरुषोत्तम पाटील यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव….

 

चिखली | प्रतिनिधी

सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात सातत्यपूर्ण, निर्भीड आणि प्रभावी कार्य केल्याबद्दल प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील यांना नीती आयोगाच्या माध्यमातून “छत्रपती शिवाजी महाराज शूरता पुरस्कार–२०२५” जाहीर करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार देशभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना प्रदान केला जातो.

 

प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील हे हॅपिनेस कन्सल्टंट, प्रमाणित मानसशास्त्रीय समुपदेशक, रिलेशनशिप कोच, लेखक व फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असून, मानसिक आरोग्य जनजागृती, युवक मार्गदर्शन, करिअर समुपदेशन, नातेसंबंध सल्ला तसेच सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

समाजातील युवक, विद्यार्थी, कुटुंबे व सामान्य नागरिकांसाठी त्यांनी विविध कार्यशाळा, समुपदेशन सत्रे आणि जनजागृती उपक्रम राबवले आहेत. मानसिक आरोग्याविषयी असलेली भीती दूर करून सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक युवकांना योग्य दिशा मिळाली असून समाजात सकारात्मक बदल घडून आला आहे.

नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समाजहितासाठी निर्भीडपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, निर्भीड नेतृत्व, स्वराज्यनिष्ठा व लोककल्याणाच्या विचारांना समर्पित असलेला हा पुरस्कार समाजासाठी धैर्याने कार्य करणाऱ्यांना प्रदान केला जातो.

विशेष म्हणजे, यापूर्वीही प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील यांना राष्ट्रीय व राज्यस्तरावरील एकूण १७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे हा सन्मान त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे मानले जात आहे.

हा पुरस्कार जीवन जागृती सेवा संस्थान यांच्या वतीने प्रदान करण्यात आला असून, २१ डिसेंबर २०२५ रोजी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल झाले असून, प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील यांच्यावर विविध सामाजिक संस्था, मान्यवर व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार