Home / महाराष्ट्र / वाशिम / मानोरा येथे आमदार सईताई डहाके यांचे आगमन; धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती…

मानोरा येथे आमदार सईताई डहाके यांचे आगमन; धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती…

मानोरा (जि. प्रतिनिधी : सुधीर ढगे) — करंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके यांचे आज शनिवारी मानोरा शहरात आगमन झाले. यावेळी त्यांच्या हस्ते मानोरा येथे सुरू असलेल्या भागवत कथेतील आरतीला उपस्थित राहून त्यांनी भक्तांशी संवाद साधला. तसेच भागवत कथेचे आयोजक यांच्यासोबत कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती घेतली.
यानंतर वसंत नगर, मानोरा येथे नवीनच बांधण्यात आलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात सायंकाळच्या आरतीला आमदार सईताई डहाके यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी मंदिराचे सर्व कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मंदिर परिसरात सभागृह उभारण्याची मागणी आमदार सईताई डहाके यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी भक्तांसाठी सभागृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर मंदिर कार्यकर्त्यांच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांना महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, चव्हाण भाऊ, डॉ. नवल, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. जे. एस. राठी, राजू देशमुख यांच्यासह तालुक्यातील व गावातील सर्व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार