Home / Uncategorized / शेतीच्या वादावरून दोन भावात हाणामारी ..!

शेतीच्या वादावरून दोन भावात हाणामारी ..!

 

 

रायपूर(प्रतिनिधी ) महेंद्र हिवाळे :  – पोलीस स्टेशन हद्दीत दि. 10/12/2025 रोजी सकाळी . ०.११वा.च्या सुमारास चिखली तालुक्यातील साकेगाव येथील भारत फकिरा इंगळे व शरद फकिरा इंगळे या दोन्ही सख्या भावांमध्ये शेतीच्या कारणावरून वाद झाला. या वादामध्ये शरद फकिरा इंगळे त्यांचा मोठा भाऊ भारत फकिरा इंगळे यांना पाठीवर व पोटावर चाकूने वार करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला .जखमी झालेले भारत फकिरा इंगळे यांची सून नामे वैशाली गोपाळ इंगळे यांनी तक्रार दिली . पोलीस स्टेशन रायपूर येथे अपराध क्र 235/25 कलम 109,115(2),118(1),352 प्रमाणे गुन्हा नोंद झाल्याने पोलीस स्टेशन रायपूर येथील ठाणेदार श्री .निलेश सोळंके, पोहेकॉ शितोळे, पो. कॉ राहुल जाधव, शिंदे, कळमकर, काझी यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुलढाणा येथील फॉरन्सिक व्हॅन सुद्धा घटनास्थळावर दाखल झाली होती. घटनास्थळला उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांनी भेट दिली. सदर गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक नीलेश तांबे. अपर पोलीस अधीक्षक ,खामगाव. उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश सोळंके पो कॉ लक्ष्मण शिंदे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार