Home / Uncategorized / अंसरवाडी बीटमध्ये वन गुन्ह्यातील फरार आरोपीस एक वर्षानंतर अटक करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त…

अंसरवाडी बीटमध्ये वन गुन्ह्यातील फरार आरोपीस एक वर्षानंतर अटक करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त…

बुलडाणा जिल्ह्या प्रतिनिधी:-

बुलढाणा वन विभागाच्या अंचरवाडी बिट अंतर्गत कक्ष क्रमांक 649, शेळगाव आटोळ परिसरात जून 2025 मध्ये अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात वनरक्षक श्री. जी. एम. पोटे यांनी वन गुन्हा जारी केला होता.

 

सदर वन गुन्ह्यामध्ये एकूण 112.13 ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपी नामे गणेश संपतराव गावंडे, रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली, जि. बुलढाणा हे गुन्हा दाखल झाल्यापासून मागील एक वर्षापासून फरार होते.

दिनांक 01/07/2026 रोजी वनपाल श्री. पी. पी. मुंडे, वनरक्षक श्री. जी. एम. पोटे व अंचरवाडी बिटच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठ्या शिताफीने फरार आरोपीस ताब्यात घेतले तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून पुढील कारवाईसाठी लाकूड आगार डेपो, बुलढाणा येथे आणण्यात आले.

सदर कारवाईमध्ये माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक वन विभाग बुलढाणा श्री. सुनील वाकोडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ही कारवाई उप वनसंरक्षक, बुलढाणा श्री. जमीर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या करण्यात आली.

वन विभागाकडून अवैध उत्खनन, वन क्षेत्रातील गैरप्रकार व वन संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही.

वन विभाग, बुलढाणा उप वनसंरक्षक जमीर शेख साहेब..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार