आई-वडिलांसह मोलाचे मार्गदर्शन काका व काकू यांनी केले.
बुलढाणा (रायपुर ) चिखली प्रतिनिधी महेंद्र हिवाळे : – बुलडाणा जिल्हातील रायपूर येथील अभिषेक मिरा वसंता सास्ते या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आई वडील शेतमजूरी करीत जेमतेम मिळणारे अश्या गरिब कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घेवून शासकीय नोकरी मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची नुकतीच एअर फोर्स मध्ये फौजी पदावर नेमणूक झाली आहे. यात रायपुर येथील अभिषेक मिरा वसंता सास्ते या तरुणांचा सहभाग आहे. रायपूर येथील शेतमजुरी करणारे मिरा वसंता सास्ते यांचा मुलगा अभिषेक सास्ते यांने अत्यंत गरिबी व हालाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेत एअर फोर्स मध्ये फौजी या पदापर्यंत बाजी मारली. त्यांने पहिली ते आठवी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा रायपूर व दहावीचे शिक्षण जनता विदयालय पिपंळगाव सराई व पुढील शिक्षणासाठी मधील महाविद्यालयात धाड शिक्षण घेतले. अभिषेकने शासकीय काही दिवस घरी बसून ओनलाईन क्लाससेस केले. रायपूरयेथील राजमुद्रा अभ्यासीका पदासाठी जमतेम एक वर्ष महिन्यापूर्वी छ.संभाजी नगर येथे परीक्षा दिली होती. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मैदानी कसरत तसेच वैद्यकीय तपासणी मुबंई जिल्ह्यातील मुबंई येथे झाली. त्यात पात्र ठरल्याने ८ डिसेंबर रोजी त्याला नियुक्ती पत्र प्राप्त झाले .मनात जिद्द व चिकाटी तसेच ध्येय प्राप्त करण्याचा शुद्ध हेतू असल्यास ध्येयप्राप्ती होते हे रायपूर येथील अभिषेक वसंता सास्ते या युवकाने सिद्ध केले आहे.





