Home / राजकारण / दिव्याला विझत असल्याची जाणीव झाली की तो अधिक फडफडतो… सौ. संध्या कोठारी..!

दिव्याला विझत असल्याची जाणीव झाली की तो अधिक फडफडतो… सौ. संध्या कोठारी..!

राहुल बोन्द्रे यांच्या आरोपावर भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित यांचाही आहेर…..

 

चिखली:- चिखली मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक या दोन्ही स्तरावर प्रचंड मोठी आघाडी घेतली असून, शारीरिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक सर्व स्तरावर राहुल बोंद्रे यांना जी हानी आमदार श्वेता महाले पाटील यांच्या उदयामुळे झाली आहे त्याचा परिणाम आता मानसिक स्तरावरही पोहोचला आहे, हे दिसून येत आहे.असा उपरोधीक टोला भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सागर पुरोहित यांनी माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांना लगावला आहे.

 

काँग्रेस पक्षामध्ये बरळण्याची स्पर्धा लागल्यासारखी केंद्र, राज्य व जिल्हा स्तरावरील नेते बरळताना दिसत असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी काँग्रेसच्या लोकांना विशेष प्रशिक्षण देण्याची सुविधा तयार केलेली दिसते असे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना औरंगजेबाशी करतात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला व मुख्यमंत्र्याला दरिंदा,डाकू,आका असे शब्दप्रयोग वापरतात, अशा वाचाळ प्रदेशाध्यक्ष कडून प्रेरणा घेतलेले जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे आपल्या प्रदेशाध्यक्षपेक्षाही दोन पावले पुढे दिसतात.

अंबिका अर्बन या पतसंस्थेकडून व या पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती संध्या कोठारी यांच्याकडून आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमांमध्ये आमंत्रणावरून पोहोचलेले माननीय मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव श्री विद्याधर महाले यांच्या चिखली शहरातील आगमन व फिरण्यावर बंदी घालावी की काय? या प्रकारे त्यांचा राजकारणातील प्रत्यक्ष सहभागाशी संबंध जोडून माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांचे पती व माननीय मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव श्री विद्याधर महाले यांच्यावर फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विविध आरोप केले. या आरोपाबाबत विचारणा केली असता श्री सागर पूरोहित यांनी वरील प्रमाणे उत्तर दिले.

राहुल बोंद्रे यांनी केलेल्या आरोपावर अंबिका अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या कोठारी यांनी हसून “त्यांना कुणीतरी गांभीर्याने घ्यावे, म्हणून त्यांचे अशेच काही चाळे सुरु असतात” एवढी साधी प्रतिक्रिया दिली आणी “आमचे लक्ष रडगाणे गाण्यावर नसून निवडणूक जिंकण्यावर” असल्याचे सांगितले. “आम्हाला चिखली शहराचा सर्वांग सुंदर विकास साधायचा आहे, समाजातील सर्व स्तरातील लोकांना सर्व सुविधा अतिशय दर्जेदार मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करत असून या प्रयत्नाला जनता जनार्दनाचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे त्यामुळे चिखली नगराध्यक्ष पदाची निवडणूक आमच्यासाठी खूप सोपी झाली असून या ठिकाणी आमचे उमेदवार पंडित दादा देशमुख व सर्व नगरसेवक निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. जनतेचे हे प्रेम व पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांची डोकी दुखणे साहजिक आहे, पण तो त्यांचा प्रश्न आहे.. दिवा विझताना अधिक फडफडतो आणि याची जाणीव सर्वप्रथम दिव्यालाच होत असते! कदाचित राहुल बोंद्रे यांना याची जाणीव झाली असेल त्यामुळे ते राजकारणाबाहेर जाऊनही आरोप करू लागले असतील” असे मिश्किल उत्तर सौ. संध्या कोठारी यांनी दिले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार