Home / Uncategorized / तिरंगा रॅलीने वैजापूर शहर दणाणले–धोंडीराम राजपूत…

तिरंगा रॅलीने वैजापूर शहर दणाणले–धोंडीराम राजपूत…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

वैजापूर ता.१३

“हर घर तिरंगा-घर घर तिरंगा”,तिरंगा देशकी शान है-तिरंगा देशका अभिमान है”,भारत माता की जय”, “वंदे मातरम” “तिरंगा  फहराएगे-देश आगे बढाऍंगे”अशा घोषणा देत व हातात तिरंगा घेत वैजापूर सेंट मोनिका इंग्लिश विद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक,सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक,पालिका व इतर शाळांचे शिक्षक

यांनी तिरंगा रॅली ने वैजापूरकरांना स्वातंत्र्य दिनाची

जागृती करून “तिरंगा रॅली” चा उद्धेशाने गुरुवार(ता१३) रोजी जागृती केली.डॉ ,बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी,उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, उपनगराध्यक्ष रियाज अकिल शेख,मुख्याधिकारी भागवत  बिघोत राजपूत, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, व सर्व नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व”तिरंगा रॅली”ध्वज दाखविला. पाऊस सुरू असताना “भारत मातेच्या जय घोषाने व “हर घर तिरंगा -घर घर तिरंगा” या घोषणांनी वैजापूर दणाणून सोडण्यात आले.या तिरंगा रॅलीची सांगतारंभ पंचायत समिती

सभागृहात डॉ. परदेशी व भागवत बिघोत यांच्या  भाषणाने होऊन संचलन कर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी वंदे मातरम व राष्ट्रगीत  गाऊन करण्यात आला

या तिरंगा रॅलीत  नगरसेवक दशरथ बनकर, विशाल

संचेती, पारस घाटे, बाबासाहेब पुतळे,राजेश गायकवाड, आमिरअली,प्रशांत कंगले,शैलेंस्य तसेच नगरसेविका,ज्योती जोशी, संगीता राजपूत, जयश्री राजपूत, दीपा राजपूत,पूजा त्रिभुवन,मोनाली खैरे,अनिता तांबे,सुरेश तांबे, दिनेश राजपूत,विनोद राजपूत,डॉ.बी.बी.शिंदे,सावन चौधरी, तसेच पर्यवेक्षक किशोर साळुंकर,भाग्यवंत,डी.थोरात,वैशाली पवार, एन, सी,सी,ऑफिसर वकार पठाण शैलीश पोंदे,प्रेम राजपूत,,विष्णू आलूले, शंकर जोरे,प्रमोद निकाळे,बी,बी,जध्वज यांच्या सह शिक्षक, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले

सहभागी झाले होते.या तिरंगा रॅली चे नियोजन व सूत्र संचलन

धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,तर आभार मुख्याधिकारी बिघोत यांनी मानले

(फोटो कॅप्शन-रॅली त सहभागी महिला नगरसेविका व महिला वर्ग ,विद्यार्थी, तिरंग्या सह घोषणा देत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार