चिखली | मेघा जाधव
चिखली : येथील स्थानिक राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिखली मध्ये दि. ३१/०१/२०२६ रोजी विद्यार्थ्यांनी ऑरेंज डे उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या दीपा वाघ तर प्रमुख पाहुणे कल्पना देशमुख , अनिल नरवाडे ,करण मिसाळ हे होते. या कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते के .जी टू च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक महिन्याच्या एका शनिवारी शाळेत कलर डे साजरा करण्यात येतो . नर्सरी ते के.जी टू च्या छोट्या छोट्या चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. तसेच साधना इटे व रेणुका सोनुने यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले. व अरुण मुंडलिक सरांनी विद्यार्थ्यांना ऑरेंज डे बद्दल मार्गदर्शन केले . ऑरेंज कलर चे महत्व विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या भाषणातून पटवून सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधने इटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनिता बावणे यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .संस्थेचे अध्यक्ष तथा चिखली शहराचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपाध्यक्ष किशोर दहिवाळ , सचिव कमलकिशोर लांडगे ,रघुनाथ पवळ, सुनील देशमुख ,चेतन देशमुख ,ज्योती देशमुख, वैशाली देशमुख शाळेच्या प्राचार्य दीपा वाघ यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले …..






