चिखली (लोक महाराष्ट्र न्यूज )चिखली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक महिला उमेदवार सौ. अनिताताई राहुल पवार यांनी आपल्या जनसंपर्क मोहिमेला वेग दिला आहे. “वार्डाचा विकास म्हणूनच वार्डामध्ये सर्वांच्या दारी एकमेव उमेदवार” या भावनेने त्या दिवस-रात्र प्रभागातील नागरिकांशी संपर्क साधत आहेत.

उच्चशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व असलेल्या अनिताताई पवार या महिला विभागातील उमेदवार असूनही रातंदिवस प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रभागातील प्रत्येक मतदारांच्या दारापर्यंत जाऊन आपल्या विकासाच्या अजेंड्याची माहिती देत त्या जनतेशी थेट संवाद साधत आहेत.
त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना वार्डातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी “आपला पुढचा प्रवास निश्चितच विजयानं संपेल” असा विश्वास व्यक्त केला आहे.

सौ. अनिताताई राहुल पवार या सर्वधर्म समभावाची जोपासना करत, प्रत्येक घरात समरसतेची बीजे पेरत आहेत. “जनतेची हाक, मतदारांची साथ आणि प्रभागाचा विकास” या उद्देशाने त्या घराघरात फिरत प्रभागाच्या विकासासाठी सज्ज झाल्या आहेत.







