Home / Uncategorized / स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांचे माणुसकी वृद्धाश्रमात सेवा समर्पण…

स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांचे माणुसकी वृद्धाश्रमात सेवा समर्पण…

(छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)

छत्रपती संभाजीनगर :शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसते; ते माणूस घडवते आणि माणुसकी शिकवते.याच भावनेतून स्टेपिंग स्टोन्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित माणुसकी वृद्धाश्रम, गावंदरी तांडा, जटवाडा रोड येथील वृद्धाश्रम साठी धान्य, किराणा साहित्य, व्हीलचेअर, वॉकर तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काठ्या भेट दिल्या. मात्र या भेटीचे खरे मोल केवळ दिलेल्या वस्तूंमध्ये नव्हते, तर त्यांच्या मागे असलेल्या मायेच्या भावनेत होते.

सर्वांनी संस्था अध्यक्ष याच्याशी मनमोकळा संवाद साधला, त्यांची आस्थेने विचारपूस केली . ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि डोळ्यांत दिसणारे समाधान हेच या सेवाकार्याचे खरे फलित ठरले.

कधी कधी एखाद्याला देण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; थोडा वेळ, दोन प्रेमाचे शब्द आणि आपुलकीचा स्पर्शही कोणाचे तरी मन उजळून टाकतो.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सेवा म्हणजे केवळ मदत नव्हे, तर माणुसकी जपण्याची एक सुंदर जबाबदारी आहे, हा अनुभव मिळाला. लहान वयातच त्यांच्या मनात संवेदनशीलता, सहानुभूती, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची बीजे रुजावीत, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी स्टेपिंग स्टोन्स विद्यालयाच्या निदेशिका श्रीमती नसीम रहीम मॅडम म्हणाल्या की यापुढेही तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला नक्कीच कळवा आम्ही खऱ्या समाजातील हिऱ्यांसोबत काम करण्यास तत्पर आहोत कुठलीही मदत लागली तरी तुम्ही मी संकोचपणे आम्हाला कळवा यावेळी निदेशक जहीम रहीम,प्रधानाचार्य संदीप मालू सर,डॉ.वंगीशा सरोदो,

सह.शिक्षक मुबारक शाहा,जीवन कुलकर्णी,डॉ.शरद सोनवणे सर,सुमित पंडित, पूजा पंडित तसेच माणुसकी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

वृद्धांच्या चेहऱ्यावरचे समाधान, विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली संवेदना आणि सेवेतून मिळालेला आनंद—यातूनच या भेटीने ‘माणुसकी’चा खरा अर्थ अनुभवायला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार