Home / Uncategorized / शिक्षक मतदारसंघात डॉ. सुमित पवार यांना वाढता पाठिंबा; मानोरा तालुक्यातूनही सकारात्मक प्रतिसाद!

शिक्षक मतदारसंघात डॉ. सुमित पवार यांना वाढता पाठिंबा; मानोरा तालुक्यातूनही सकारात्मक प्रतिसाद!

मानोरा तालुका प्रतिनिधी : सुधीर ढगे

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. सुमित पवार यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः बहुजन समाजातील विविध घटकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मानोरा तालुक्यातील आढाव्यानुसार, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये डॉ. सुमित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून, शिक्षक मतदारांकडून त्यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तसेच भाजपमधील काही घटकांचा छुपा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत डॉ. सुमित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मानोरा तालुक्यातील शिक्षक मतदारांचा कल आणि विविध स्तरांतून मिळणारा प्रतिसाद यामुळे डॉ. सुमित पवार यांच्या विजयाच्या शक्यतेबाबत समर्थकांकडून आशावाद व्यक्त केला जात आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच मतदारांचा अंतिम कौल स्पष्ट होणार आहे.

लोक महाराष्ट्र न्यूज — बातमी थेट जनतेच्या प्रश्नांची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार