Home / Uncategorized / ‘हे बंध रेशमाचे’ उपवर-वधू परिचय मेळाव्याच्या आयोजन समितीची निवड; श्रीरामभाऊ झोरे अध्यक्षपदी….

‘हे बंध रेशमाचे’ उपवर-वधू परिचय मेळाव्याच्या आयोजन समितीची निवड; श्रीरामभाऊ झोरे अध्यक्षपदी….

 चिखली लोक महाराष्ट्र न्यूज उमा जैवाळ

चिखलीत नियोजन बैठक उत्साहात; विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, मेळावा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन

चिखली, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हे बंध रेशमाचे’ सर्व शाखीय माळी समाज उपवर-वधू परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी चिखली येथे नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मेळाव्याच्या आयोजन समितीची निवड करण्यात आली.

जागृती महिला अर्बन बँकेचे सभागृह, चिंच परिसर, चिखली, जि. बुलढाणा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त तथा कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रमेशभाऊ हिरळकर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री. विजय राजाभाऊ खरात तसेच जालना जिल्हाध्यक्ष श्री. गणेशभाऊ हरकळ उपस्थित होते.

यावेळी आगामी ‘हे बंध रेशमाचे’ उपवर-वधू परिचय मेळाव्याच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी श्री. श्रीरामभाऊ झोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच उपाध्यक्षपदी श्री. गणेशजी हरकाळ (जालना), श्री. विजय राजाभाऊ खरात (चिखली), श्री. श्रीहरी पांडुरंग मगर (भोकरदन), श्री. बंडूभाऊ काशिनाथ खरात (चिखली), श्री. बबनराव घायाळ (जालना), श्री. राजेंद्र पवार (बुलढाणा) आणि श्री. सुभाषभाऊ खरात (चिखली) यांची नियुक्ती करण्यात आली.

सचिवपदी श्री. अभय तायडे, सहसचिवपदी श्री. उमेश मोळवणे आणि कोषाध्यक्षपदी प्रा. दीपक नन्हई यांची नियुक्ती करण्यात आली. आयोजन समितीतील उर्वरित पदांवरील नियुक्त्या आयोजन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी करतील, असे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीस श्री. विजयभाऊ जागृत, श्री. राजेश द मेहेत्रे, श्री. रामेश्वर अनारसे, श्री. कैलास रसाळ, श्री. सुभाष गोरे, श्री. जनार्दन सपकाळ, श्री. राजेंद्र पवार, श्री. देविदास सुरुशे, श्री. मधुकरराव मंडळकर, श्री. प्रल्हाद खरात, श्री. रमेश जैवाळ, श्री. बबनराव घायाळ, डॉ. रमेश मोठे, श्री. गंगाधर आढाव, श्री. फकीरा भराड, श्री. सुभाष गोरे सागवन यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.

माळी समाजातील विवाहच्छुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विविध शाखांतील समाजबांधवांना एकत्र आणणे तसेच समाजामध्ये सुसंवाद आणि सामाजिक ऐक्य निर्माण करणे, हा या परिचय मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्वांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक नन्हई यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विजयभाऊ खरात यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार