Home / Uncategorized / लेक शिकवा.. लेकीला पंख द्या आणि आकाशाला गवसणी घालू द्या! – समाजसुधारक अमोलभाऊ भागवत….

लेक शिकवा.. लेकीला पंख द्या आणि आकाशाला गवसणी घालू द्या! – समाजसुधारक अमोलभाऊ भागवत….

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

संपूर्ण भारतात आजच्या घडीला अनेक भागांमध्ये चिंतेचा विषय ठरलेल्या तरुणींच्या वाढत्या आत्महत्या, युवावस्थेत सातत्याने चुकत असलेले निर्णय, संसाधनांचा गैरवापर, बदलत असलेली मानसिकता, वैचारिकता आणि यासर्वांचा सामाजिक व्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम यावर अतिशय बारकाईने प्रकाश टाकत, एकापाठोपाठ एक व्यवस्थितरित्या उपस्थित मान्यवरांकडून यासर्वांचे विश्लेषण करण्यात आले, नितांत गरजेच्या मुद्द्यांवर जनजागृती शिबिर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ व याची सुरुवात भ्र.नि.स राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांच्या मुख्य मार्गदर्शनांतर्गत नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे या गावामधून “लेक लाडकी… जनजागृती शिबिर”.. या माध्यमातून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि कसबे सुकेणे गावातील युवक, युवती यांच्याकडून यशस्वीरित्या करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. माधवीताई जाधव ह्या उपस्थित होत्या तसेच विषेश आकर्षण म्हणून नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांच्यासह डॉ विद्या गडाख, कवि लेखक राज शेळके, संविधान अभ्यासक, कार्याध्यक्ष अविनाश वाघ, भ्र.नि.स महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, उ.महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, जिल्हाध्यक्ष आरतीताई भोज, अध्यक्षा आशाताई भोईर, सविता गांगुर्डे, सदाशिवआप्पा शेवकर अध्यक्ष, क्षत्रिय माळी समाज, आनंदराव भंडारे, सरपंच, कसबे सुकेणे, राकेशभाऊ जाधव नगरसेवक, ओझर, संगीता कडाळे जनसेविका, निखिल भैय्या डेर्ले तालुका अध्यक्ष, सचिनभाऊ खडताळे, युवक काँग्रेस अध्यक्ष, निफाड, भ्र.नि.स चे राहुल मोरे, श्याम डावरे, सागर कातकडे सर, आकाशजी बैरागी सर आणि संजयनाना बलकवडे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन ॲड अरिंगळे व सौ. शिंदे मॅडम यांनी सुनियोजित पद्धतीने केले.

दुर्लक्षित विषय आणि विभाग यांच्याकडेच प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून त्यावर नियोजनशील पद्धतीने काम करण्याची पद्धत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही सर्वच भागात करत असल्याचे प्रतिपादन माननीय अमोलभाऊ भागवत यांनी केले, तसेच परिसरातील गुणवंत विद्यार्थी, आरोग्यसेवक, समाजसेवक यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले आणि लेक लाडकी जनजागृती शिबिराच्या आयोजनासाठी मुख्य सहकार्य करणाऱ्या स्थानिक युवक युवतींचे त्यांनी विशेष आभार मानले व भरभरून कौतुक केले. उपस्थितांकडून कार्यक्रमासाठी अतोनात मेहनत,सहकार्य केलेल्या कसबे सुकेणे येथील युवानेते श्री वैभव कर्डक, श्री सूरदास पावसे, श्रीमती देविका खराटे, श्रीमती प्रणाली काळे, किरण जगताप , श्रीमती मनाली पाटील, श्रीमती विद्या पाटील, श्रीमती अश्विनी खाडे श्री एकनाथ लोखंडे, श्री चिंतामण पागे,श्री ज्ञानेश्वर कर्डक, श्री विलास कर्डक, श्री योगेश कर्डक, श्री संतोष कर्डक, श्री संतोष कार्की, श्री शुभम भंडारे, श्री ओमकार शेवकर, श्री रोशन कर्डक, श्री ऋषिकेश बस्ते, श्री तेजस पेढेकर श्री सूरज कर्डक, श्री साहिल गांगुर्डे, श्री सार्थक कर्डक, श्री राहुल मोरे, श्री कार्तिक कर्डक, श्री रितेश कर्डक, श्री विराट कर्डक या सर्वांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले व आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी कसबे सुकेणे येथील युवकांनी व अमोलभाऊ भागवत यांनी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ नुसार विजेत्या महिलांना उत्कृष्ट बक्षीसे देखील देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार