Home / Uncategorized / नरवीर जिवाजी महाले यांची जयंती माणुसकी वृध्द आश्रमात उत्साहात साजरी….

नरवीर जिवाजी महाले यांची जयंती माणुसकी वृध्द आश्रमात उत्साहात साजरी….

(छत्रपती संभाजी जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)

छत्रपती संभाजी नगर :- माणुसकी रुग्ण सेवा समूह आणि सु-लक्ष्मी सामाजिक संस्थेच्या वतीने आज शुक्रवार ९ अक्टोबर रोजी नरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीदिनी माणुसकी वृद्ध आश्रम गावंदरी तांडा जटवाडा रोड येथे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न विर जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, “होता जिवा म्हणून वाचला शिवा” हे ब्रिद जनमानसात प्रसिद्ध आहे, शिवरत्न विर जिवाजी महाले यांचा पराक्रम, सय्यदबंडा याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेला वार स्वतःच्या अंगावर झेलून महाराजांच्या अनमोल जिवाचे रक्षण करणारा जिवा ही इतिहासाला व महाराष्ट्राला मिळालेले अनमोल रत्न आहे, जिवा महाले मुळचे धुळे जिल्ह्यातील पण महाराजांच्या तत्कालीन मुलखात स्थलांतरीत झालेले ,ते संकपाळ वैगरे कुलनामाचे नसून महाले या कुळनामाचेच आहेत आजकाल जी इतिहासाची चिरफाड चालू आहे त्याने चुकिचा इतिहास जनमाणसात जावू नये,महापुरुष कुण्या एका

जातीचे,धर्माचे ,नसतात तर ते राष्ट्राचा अनमोल ठेवा असतात.असे जिवा महालें च्या इतिहासावर प्रकाश टाकतांना पुजा पंडित समाजसेविका यांनी प्रतिपादन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार