Home / Uncategorized / पाळधीच्या दोन कबड्डीपटूंची जिल्हा संघात निवड…

पाळधीच्या दोन कबड्डीपटूंची जिल्हा संघात निवड…

 जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

पहूर ता. जामनेर : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ८ ते ११ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पालघर येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा कबड्डी संघाची निवड करण्यात आली असून, पाळधी येथील जय श्री राम कबड्डी संघाच्या दोन महिला खेळाडूंची १९ वर्षे वयोगटात जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.

यामध्ये कु. हर्षदा सुभाष माळी आणि कु. गायत्री कडुबा माळी यांचा समावेश आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही निवड मिळवली आहे.

या निवडीबद्दल दोन्ही खेळाडूंचे पालक, प्रशिक्षक तसेच जय श्री राम कबड्डी संघ पाळधीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

पाळधीच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन खेळाडूंची जिल्हा संघात निवड.

हर्षदा माळी व गायत्री माळी दोघांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी तसेच ग्रामीण परिसरातील मर्यादित साधनसुविधांमध्ये सातत्याने सराव करत आपल्या खेळ कौशल्याला धार दिली त्यांच्या परिश्रमाला जय श्रीराम कबड्डी संघातील प्रशिक्षक म्हणून जामनेर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले उज्वल जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार