छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता.०५
औंढा नागनाथ येथील साई भक्त व शिव भक्तांची पायी दिंडी वैजापूरात वैष्णवी लौन येथे रविवार(ता.०४)रोजी येताच येथील शिर्डीचे “प्रति साई बाबा” म्हणून परिचित असलेले धोंडीरामसिंह राजपूत या दिंडीतिल साई भक्तांच्या आग्रहास्तव शिर्डीच्या श्री साईबाबांची वेषभूषा परिधान करून
आरतीत सहभागी झाले. औंढा नागनाथ येथील शिर्डी पायी दिंडीतील साई भक्त प्रति साईबाबा पाहून भारावले व दर्शनासाठी त्यांची रांग लागली.या प्रसंगी या दिंडीचे आयोजक संतोष बोथरा,प्रकाशशेठ बोथरा,सुधीर लालसरे,गिरीश भालेराव, श्री छाजेड,श्री संचेती,संतोष पवार, श्री. धुमाळ,श्री,शिंपी ,काशिनाथ आगाज,श्रावण चौधरी,गणेश धुमाळ, महेश जाधव,विजय जोशी व कुलकर्णी यांनी दिंडी सेवकांची सेवा केली.

(औंढा नागनाथ येथील दिंडी व साई भक्त)






