Home / Uncategorized / महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन…

महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन…

जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

अहिंसा व सत्याचा मार्ग जीवनात आचरणात आणण्याचे;प्रा.राजश्री महाजन यांचे आवाहन

जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू. जे. महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद एकनाथ वैदकर यांनी केले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकत स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, सत्याग्रहाची भूमिका आणि समाजाला दिलेला संदेश याबाबत माहिती दिली. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने समाज परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांची आजच्या काळातही आवश्यकता असून, विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा, शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करावा, असे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन जाण्याची त्यांची भूमिका याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी, सत्यनिष्ठा आणि अहिंसेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या विचारांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. एस. के. वानखेडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकवृंद व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार