Home / Uncategorized / मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ तात्काळ द्या….

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ तात्काळ द्या….

लोक महाराष्ट्र न्यूज उमा जैवाळ 

युवा नेते शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चिखली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी युवा नेते शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी मयत शेतकऱ्यांच्या वारसांची अनेक प्रकरणे KYC, आधार प्रमाणीकरण, AgriStack नोंदणी तसेच आवश्यक कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

मयत शेतकऱ्यांच्या प्रकरणांची स्वतंत्र छाननी करून वारसांची KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

आधार प्रमाणीकरण व AgriStack नोंदणीची प्रक्रिया सुलभ करून स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात.

आवश्यक कागदपत्रे एकाच वेळी स्वीकारून वारसांना वारंवार बँकेत बोलावू नये.

वारस प्रमाणपत्र, आधार, पॅनकार्ड आदी कागदपत्रे सादर केल्यानंतर प्रकरणाची सद्यस्थिती वारसांना कळवावी.

चिखली तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची गावनिहाय व बँकनिहाय माहिती संकलित करून तातडीने निपटारा करावा.

संबंधित बँकांना वरिष्ठ स्तरावरून निर्देश देऊन विलंब टाळावा.

कागदपत्रे पूर्ण असलेल्या प्रकरणांना प्राधान्य देऊन कर्जमुक्तीचा लाभ तात्काळ द्यावा.

कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या लेखी स्वरूपात कळवून पूर्ततेची संधी द्यावी.

तहसील कार्यालय व सहकार विभागामार्फत विशेष मदत कक्ष किंवा संपर्क अधिकारी उपलब्ध करून द्यावा.

प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घेऊन कालबद्ध पद्धतीने निपटारा करावा.

मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी KYC, आधार प्रमाणीकरण, AgriStack नोंदणी आणि बँक स्तरावरील कार्यवाही जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पात्र वारसांना शासन योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी केली.

या निवेदनामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांच्या प्रलंबित प्रश्नावर प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे संबंधित शेतकरी कुटुंबांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार