Home / Uncategorized / छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सावळदबारात शांतता कमेटीची बैठकछत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सावळदबारात शांतता कमेटीची बैठकछत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत संपन्न

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

डिजे न लावता शांततेत मिरवणूक काढा; सपोनि प्रफुल साबळे यांचे आवाहन…

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दिनांक १७ फेब्रुवारी रोजी भगवान श्रीचक्रधर स्वामी मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमेटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आगामी शिवजयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि डिजेचा वापर न करता साजरा करण्याचे आवाहन फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रफुल्ल साबळे यांनी यावेळी उपस्थितांना केले.

बैठकीत बोलताना सपोनि साबळे म्हणाले की, शिवजयंती हा राष्ट्रीय अस्मितेचा व प्रेरणेचा उत्सव असून तो सामाजिक सलोखा राखत साजरा करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था भंग करणारा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. गुन्हा दाखल होईल असे कृत्य कोणीही करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश कोते, सचिव आकाश गायकवाड, उपाध्यक्ष भावेश टिकारे, सल्लागार संदीप कोलते पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा करताना मिरवणूक मार्ग, वेळापत्रक, स्वयंसेवकांची नियुक्ती, वाहतूक व्यवस्थापन, तसेच शांतता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवजयंती उत्सव मंडळाचे सचिव आकाश गायकवाड यांनी सांगितले की, शिवजयंती उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

शिवरायांच्या विचारांचा आदर्श ठेवत, सामाजिक ऐक्य जपत आणि कायद्याच्या चौकटीत राहून शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार