छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भोकरदन : मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१५ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी दिनानिमित्त समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. गोवर्धन मुळक यांनी हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराविषयी मार्गदर्शन केले. जगभरातील विविध साहित्य संस्था हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असून हिंदी ही जनमानसाची भाषा म्हणून सर्वत्र प्रचलित असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. आसाराम बेवले यांनी केला. हिंदी भाषा व साहित्याला प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभला असल्याचे त्यांनी नमूद केले.
१७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘प्रयास’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य डॉ .डोंगरे म्हणाले की,भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व, साहित्य, संस्कृती, राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे योगदान तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवरील आपले विचार सर्जनशील पद्धतीने मांडले आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात महाविलयात करण्यात आले.
२२ सप्टेंबर २०२६ रोजी आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रो. अश्विन रांजणीकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे होते.
२३ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या लेखनकौशल्याला व विचारक्षमतेला चालना मिळावी, या उद्देशाने ‘इंडिया नहीं, भारत कहेंगे’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आचल रगडे, वैभव बोर्डे, पूजा जारवाल, विजय पुंड, माधुरी सुरडकर, किरण क्षीरसागर, ऋतुजा जगदाळे, पूनम रगडे, निनाद देशपांडे आणि दीपक गोराडे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. २६ सप्टेंबर रोजी हिंदी पंधरवड्याचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ .अनिता काकडे उपस्थित होत्या. यावेळी डॉ. आसाराम बेवले, प्रा. प्रेम जाधव, तसेच आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी साहित्याची समृद्ध परंपरा तसेच दैनंदिन जीवनातील हिंदी भाषेचा वापर यावर डॉ. काकडे यांनी मार्गदर्शन केले. हिंदी पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात आयोजित विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व भाषिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आस्था, अभिरुची आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.गोवर्धन मूळक, डॉ.विश्वास शिंदे, डॉ.नवल तोडावत यांनी विशेष प्रयत्न घेतले
.






