छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता.२६
शहरातील सर्व मुस्लिम बांधव व हिंदू बांधव यांनी एकत्र येत एक- दुसऱ्याना ईद-ए-मिलाद सणानिमित्त शुभेच्छा देऊन ईद-ए-मिलाद उत्सव आनंदात व उत्साहात बुधवार(ता,२६)रोजी साजरा केला.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रझा मस्जिद परिसरात सर्व मुस्लिम बांधव एकत्र जमले या ठिकाणी रथात मुफ्ती तय्यब
रशीद साहब व सय्यद जुबैर साहब यांना रथात बसवून
मिरवणूक आरंभ झाली. माजी उपनगराध्यक्ष मजीद शेठ कुरैशी, विद्यमान नगरसेवक हमीद कुरेशी,आमीरअली,सुलतान खान,सदर ए काझी हाफीजोद्दीन ,रहीम शेख ,बिलाल सौदागर, अकबर सय्यद शेख,ठाकूरधोंडीरामसिह राजपूत ,काझी इनामदार ,मन्सूरअली,अल्ताफ बाबा यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक आरंभ झाली.शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक हातात झेंडे घेऊन,व शांततेत घोषणा देतजामा मस्जिद जवळ आल्यावर नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, जेष्ठ नेते व समाज कार्यकर्ते अखिल शेठ,उपनगराध्यक्ष रियाज अकिल शेख,प्रशांत पा,सदाफळ,वैजापूर किराणा संघ अध्यक्ष प्रकाशशेठ बोथरा,विनोद राजपूत,अल्ताफ बाबा,बाबासाहेब गायकवाड,सदर काझी,राजू काझी,ऍड,अली,अकबर भाई, गयास मामु, धोंडीरामसिंह ठाकूर ,मन्सूरअली यांनी रथातील
मुफ्ती तय्यब रशीद साहब,व सय्यद जुबेर साहब यांचे
शाल अर्पण करून स्वागत केले,डॉ.दिनेश परदेशी यांनी उपस्थिताना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा दिल्या.उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोनावणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,त्याना मेटे यांनी सहकार्य केले तसेच विशेष पोलीस दस्ता ही बंदोबस्त साठी होता.






