Home / Uncategorized / फर्दापूर येथे संत सेवालाल महाराज यांचे स्मारकास मंजुरी देणार .मंत्री अतुल सावे….

फर्दापूर येथे संत सेवालाल महाराज यांचे स्मारकास मंजुरी देणार .मंत्री अतुल सावे….

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

फर्दापूर:-येथे विविध विकास कामांचे व भाजपा कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री श्री अतुल सावे व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

जिल्हाध्यक्ष आमदार सुहास शिरसाट व इद्रिस मुलतानी राज्यमंत्री दर्जा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माननीय नामदार अतुल सावे यांनी आपल्या भाषणामध्ये फर्दापूर जिल्हा परिषद गटातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही या भागातील बंजारा समाजाची अनेक दिवसां पासून ची प्रामुख्याने असलेली मागणी संत सेवालाल महाराज यांच्या स्मारक मंजुरी बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यमाने बाजारा समाजा साठी संत सेवालाल महाराज यांच्या स्मारक ला महाराष्ट्र शासन कडून मंजुरी देणार व तांडा वस्ती निधीतून फर्दापूर जिल्हा परिषद सर्कल ला दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली तसेच इद्रिस मुलतानी यांनी सहा महिन्यात मतदारसंघांमध्ये केलेला विविध विकास कामाबद्दल त्यांची प्रशंसा सुद्धा केली. रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती संभाजी नगर ते जळगाव हायवे बुलढाणा हायवे तसेच आमदार असताना येथे 33 केवी सबस्टेशन, त्यावेळी त्यांच्या काळात बांधलेले धरणे याचा उल्लेख केला व 25 वर्षांमध्ये अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता त्यांनी काय विकास केला याबद्दल प्रश्न ग्रामस्थांना विचारला. राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर ऊर्जा आरोग्य व पाणीपुरवठा मंत्री यांना या कार्यक्रमास काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही परंतु भ्रमणध्वनी वरून उपस्थित नागरिकांना त्यांनी संबोधित केले त्यांनी फर्दापूर ते सावळदबारा 33 केव्ही मेन विद्युत लाईन 8 करोड, तसेच ओवरलोड डिपी च्या मागणी संदर्भात 77 डीपी मंजूर केले, फर्दापूर येथील पाणीपुरवठा दुरुस्ती योजनेस 50 लाख रुपयांचा निधी इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुरावा वरून आपण मंजूर करून दिला असे आपल्या भाषणात सांगितले व मुलतानी आपल्या मतदारसंघातील विकासाच्या कामांसाठी यापुढेही जे काही मागणी करणार ती पूर्ण करणार अशी ग्वाही दिली. इद्रिस मुलतानी यांनी आपल्या भाषणामध्ये 25 वर्षांमध्ये आमदाराने काहीच विकास कामे केले नाही व आता आम्ही मंजूर केलेल्या कामांचे खोटे श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहे त्यांना पुरावे सादर करा असे जाहीर आव्हान केले मंजुरीच्या प्रस्तावित संदर्भात पत्रामध्ये कुठेही सत्तार यांचे नाव नाही असेहि सांगितले.

चौकट-अतुल सावे यांनी तांडा वस्ती साठी दोन कोटी निधी देणार अशी घोषणा केली.

मेघनाताई बोर्डीकर यांनी जामठी येथे 33 केवी सबस्टेशन मंजूर करणार असे जाहीर सभेत सांगितले.

यावेळी कार्यक्रमास जि.प. उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जयस्वाल, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर, किशोर आबा पवार, ज्ञानेश्वर मोठे, सुनील मिरकर, माहीन मुलतानी, पुष्पाताई काळे, सचिन वाघ,राधाकृष्ण काकडे,विकास कापसे, सभापती उत्तम चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय पाटील, उपसभापती भगवान आहेर, दिलीप काका दानेकर, सुनील गवंडे,जयप्रकाश चव्हाण, शिवाजी बुडाळ गणेश लोखंडे राजेंद्र जावळे अनिल खरात आत्माराम पाडळे एकनाथ हिवाळे स्वप्निल शिनगारे गणेश भूमकर अरुण काळे मेघराज चोंडीये, समाधान बावस्कर, जगन गवांडे, निसार शेख, अजित पठाण, भगवान जाधव, संतोष शिंदे, अण्णा तांगडे, इस्माईल शेख, कृष्णा शिरसाट, योगेश शिंदे, विलास आगळे, फिरोज तडवी, माजिद्द तडवी, समीर तडवी, गुलाब तडवी, भगवान वाघ, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार