मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे
मानोरा येथे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ गीताबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह कृतीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदविला. ‘वंदे मातरम्’ हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे स्थान असलेले राष्ट्रगीत असून त्याचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ गीत सुरू असताना सोनिया गांधी यांनी ते थांबविण्यास सांगितल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. यावेळी खडके साहेब आणि सोनिया गांधी यांच्यात संभाषण सुरू असल्याने गीत बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ मानोरा येथे भाजपच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
या निषेध मोर्चामध्ये भाजप तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, शहराध्यक्ष राजीव देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांच्या कथित कृतीचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली.






