जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
रत्नागिरी येथे २७ ते ३० ऑगस्टदरम्यान स्पर्धा; क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन
जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थी कुमार प्रसाद सोनवणे याची ४०व्या ज्युनियर राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रत्नागिरी येथे दि. २७ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान ही स्पर्धा होणार असून, प्रसाद सोनवणे ११० मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
प्रसादने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळविले आहे. त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले असून, पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाविद्यालयाचे डॉ. श्री. केतन नारखेडे (प्रभारी प्राचार्य, एम.जे. स्वायत्त महाविद्यालय), प्रा. श्री. आर. बी. ठाकरे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे (समन्वयक), प्रा. सौ. राजश्री महाजन (उपप्राचार्य), प्रा. सौ. शिल्पा सरोदे (पर्यवेक्षिका), प्रा. श्री. उमेश पाटील (समन्वयक, कला व वाणिज्य शाखा), प्रा. श्री. गुणवंत वंजारी (समन्वयक, विज्ञान शाखा) तसेच प्रा. सौ. वर्षा पाटील (चेअरमन, जिमखाना समिती) यांनी प्रसादचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसाद सोनवणे याला डॉ. रणजीत पाटील (क्रीडा शिक्षक) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि मार्गदर्शनाच्या बळावर प्रसादने मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालय, पालक तसेच जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही प्रसादने दमदार कामगिरी करावी, यासाठी त्याच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






