Home / समाज / वाढदिवसानिमित्त साडी चोळी व फराळ वाटप कार्यक्रमाने साजरा उत्सवमय सोहळा — सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला उपक्रम

वाढदिवसानिमित्त साडी चोळी व फराळ वाटप कार्यक्रमाने साजरा उत्सवमय सोहळा — सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला उपक्रम

 

इसोली (लोक महाराष्ट्र न्यूज) —

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हाप्रमुख सौ. विजयाताई खडसान यांच्या वाढदिवसानिमित्त इसोली पंचायत समिती सर्कल अंतर्गत हिवरा नाईक येथे साडी व फराळ वाटपाचा उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक जाणीव आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा वाढदिवस सोहळा उत्सवमय वातावरणात पार पडला.

हा कार्यक्रम शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख मा. प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रवक्ता मा. सौ. जयश्रीताई शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी, तरुण वर्ग तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिलांना साड्यांचे वाटप तसेच फराळाचे वितरण करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते.

कार्यक्रमात महिलांनी विजयाताई खडसान यांच्या कार्याची प्रशंसा करत “अशा समाजाभिमुख महिला नेत्यांची आज समाजाला गरज आहे” अशी भावना व्यक्त केली.

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सौ. अनिताताई येवले, तालुका संघटिका सौ. रूपालीताई चौधरी, उपतालुकाप्रमुख सुभाष मामा आटोळे, ज्येष्ठ नागरिक नारायणबाबा ढगारी, परभाकरभाऊ लथाड, गजाननभाऊ शिंदे, कैलास शिंदे सर, विश्वनाथभाऊ ढगारी, बबनभाऊ गायकवाड, बालूभाऊ ढगारी, यादवभाऊ ढगारी, वंदनाताई यादवसर ढगारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सौ. विजयाताई खडसान यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सेवा कार्य पुढे सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हिवरा नाईक व परिसरातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

सामाजिक बांधिलकी, महिलांच्या सन्मानाचा आदर्श आणि एकता यांचे दर्शन घडवणारा हा वाढदिवस सोहळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या उपक्रमशीलतेचा व संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार