Home / Uncategorized / चिंचपूर जि.प. शाळेला नवी व्यवस्थापन समिती; अध्यक्षपदी कपिल गवारगुर, उपाध्यक्षपदी शेख अहमद शेख कासम….

चिंचपूर जि.प. शाळेला नवी व्यवस्थापन समिती; अध्यक्षपदी कपिल गवारगुर, उपाध्यक्षपदी शेख अहमद शेख कासम….

खामगाव प्रतिनिधी विलास गवारगुर 

खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, चिंचपूर येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी शाळेच्या शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समितीची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्षपदी कपिल गवारगुर, तर उपाध्यक्षपदी शेख अहमद शेख कासम यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षण तज्ज्ञ म्हणून विनोद देशमुख यांची निवड झाली.

 

समितीच्या सदस्यपदी गणेश अंभोरे, संतोष राठोड, जयश्री क्षीरसागर, इंदुबाई राठोड, अनिल कदम, सरिता चपाईत, वैशाली गवारगुर, शारदा वाळके आणि अब्दुल शहा यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार