Home / Uncategorized / भाग्यश्री पाटील यांची पारोळा तालुका अध्यक्षपदी निवड; प्रवीण तायडे यांची माहिती …

भाग्यश्री पाटील यांची पारोळा तालुका अध्यक्षपदी निवड; प्रवीण तायडे यांची माहिती …

जळगाव प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या संघटनात्मक कार्याला मिळणार नवी दिशा; देवेंद्र देशमुख यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ, जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. देवेंद्रजी देशमुख यांच्या शिफारशीनुसार श्रीमती भाग्यश्री पाटील यांची पारोळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मराठा समाज तसेच महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, समाजाच्या स्वाभिमानासाठी तसेच समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. संघटनेच्या विचारांना आणि ध्येयधोरणांना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर भाग्यश्री पाटील यांच्यावर पारोळा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे माहिती कार्यकारी संपादक प्रवीण तायडे फर्दापूर यांनी बोलताना सांगितले आहे.

पारोळा तालुक्यात महासंघाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, समाजातील युवक-युवतींना संघटित करणे, समाजाच्या विविध प्रश्नांवर योग्य पद्धतीने आवाज उठविणे तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देणे, यासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाग्यश्री पाटील यांच्या माध्यमातून पारोळा तालुक्यात महासंघाचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावीपणे पोहोचेल. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटनेची ताकद वाढविण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या सदिच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार