खामगाव प्रतिनिधी: विलास गवरगुर
चिंचपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेत 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली.
विद्यार्थ्यांनी महामानवांच्या जीवनावर आधारित गीते, देशभक्ती गीते आणि पथनाट्य सादर करून सर्व उपस्थितांचे मन जिंकले. या उत्सवात मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शालेय समितीचे अध्यक्ष तसेच गावातील महिला-पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यास तसेच शालेय संस्कृती व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटविण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करून, सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.






