Home / Uncategorized / तालुका कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण; शासनाकडून निलंबन, कठोर कारवाईची मागणी

तालुका कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण; शासनाकडून निलंबन, कठोर कारवाईची मागणी

 

वाशीम | प्रतिनिधी सुधीर ढगे

 

मंगरुळनाथ तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी श्री. ऋषिकेश भिकाजी पवार यांना तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

दि. १२ जानेवारी २०२६ रोजी मौजा गोगरी, ता. मंगरुळनाथ, जि. वाशीम येथील श्री. ऋषिकेश पवार व परिसरातील सुमारे १५ शेतकऱ्यांचे रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागेचे मस्टर काढण्यात आले नसल्याने शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. याबाबत शेतकरी पवार यांनी जिल्हा कृषी अधिकारी वाशीम यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित शेतकऱ्याने दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मंगरुळनाथ पोलीस स्टेशन येथे FIR दाखल केला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत शासनाने तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना दि. १७ जानेवारी २०२६ रोजी निलंबित केले आहे. मात्र, ही कारवाई अपुरी असून दोषी अधिकाऱ्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित शेतकऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार