जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भुसावळ तालुक्यातील तळवेल, वरणगाव परिसरातील 13 वर्षीय अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देऊन आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्याबाबत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विभागाच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले
तळवेल, वरणगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर व संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर वरणगाव पोलीस स्टेशन येथे भेट देऊन बागुल सरांसोबत प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पीडित अल्पवयीन मुलीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची व परिस्थितीची विचारपूस करण्यात आली.
अल्पवयीन पीडित मुलीला या घटनेमुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तिच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेऊन तिला आवश्यक वैद्यकीय उपचार, समुपदेशन, मानसिक आधार व कायदेशीर मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
आमच्या प्रमुख मागण्या :
सदर प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक व जलदगतीने करण्यात यावा.
प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
आरोपी दोषी सिद्ध झाल्यास त्यांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी सक्षम न्यायालयात प्रभावीपणे खटला चालविण्यात यावा.
पीडित अल्पवयीन मुलीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात यावी व तिच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात यावे.
पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय उपचार, समुपदेशन, मानसिक आधार व शासनाच्या नियमानुसार उपलब्ध असलेले सर्व सहाय्य मिळवून देण्यात यावे.
या प्रकरणातील कोणत्याही व्यक्तीकडून पुरावे नष्ट करण्याचा, पीडितेवर दबाव आणण्याचा किंवा तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्यावरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
सदर प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने पूर्ण करून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र राज्य सदैव तिच्या पाठीशी राहील.
आपण सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे प्रसंगी श्रीराष्ट्रीय राजपूत काढणी सेनेचा जिल्हा अध्यक्ष सारिका ताई पाटील तालुका अध्यक्ष जयश्री पाटील जिल्हा सचिव कविता पाटील, श्रद्धा राजपूत, प्रियंका राजपूत
तसेच करणी सेनेचे कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत संदीप राणा नितीन पाटील प्रदीप पाटील आनंदा पाटील पंकज पाटील, दिवाण सिंग राजपूत चंदू चव्हाण सुरेश पाटील दयानंद पाटील आधी समाज बांधव उपस्थित होते अशी माहिती दामोदर राजपूत यांनी बोलताना सांगितले आहे.






