Home / Uncategorized / लाखनवाडा पीएससीतील प्रयोगशाळा सेवांबाबत रुग्णाची तक्रार…

लाखनवाडा पीएससीतील प्रयोगशाळा सेवांबाबत रुग्णाची तक्रार…

खामगाव प्रतिनिधी विलास गवारगुर

खामगाव तालुक्यातील लाखनवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळेत आवश्यक तपासण्या उपलब्ध नसल्याचा रुग्णाचा आरोप

खामगाव तालुक्यातील लाखनवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या विलास गवारगुर यांच्या तब्येतीची डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मलेरिया, टायफॉईड तसेच लघवीच्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी संबंधित तपासण्या चिठ्ठीवरही नमूद केल्या.

त्यानंतर विलास गवारगुर हे तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळेत गेले असता, तेथे केवळ मलेरियाची तपासणी करण्यात आली. तर टायफॉईड आणि लघवीची तपासणी बाहेरील खासगी प्रयोगशाळेतून करून घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप रुग्णाने केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या शासकीय आरोग्य संस्थेत या तपासण्या का करण्यात येत नाहीत, अशी विचारणा केली असता प्रयोगशाळेतील संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही रुग्णाचे म्हणणे आहे.

या प्रकारामुळे रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत अतिरिक्त खर्च करून तपासण्या कराव्या लागत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे लाखनवाडा पीएससीतील प्रयोगशाळेत नेमक्या कोणत्या तपासण्या उपलब्ध आहेत, कोणत्या कारणामुळे संबंधित तपासण्या करण्यात आल्या नाहीत, याची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार