मानोरा प्रतिनिधी किरण जैन.
मानोरा : मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी मानोरा येथे, भव्य असा मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तत्काळ लागू करावे या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने सुमारे ४०० च्या जवळपास समाज बांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला. हा मोर्चा पंचायत समिती कार्यालयाजवळून काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार व पुष्पृष्टी करून करून पुढे हा मोर्चा दिग्रस चौकातून मानोरा,तहसील कार्यालयात येऊन धडकला आणि तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तहसीलदारामार्फत या मोर्चाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. हे निवेदन समाज बांधवांच्या स्वाक्षरीने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.





