Home / Uncategorized / मा. उत्तम महारू चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण; मान्यवरांची उपस्थिती..

मा. उत्तम महारू चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण; मान्यवरांची उपस्थिती..

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव!महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन सोयगाव पंचायत समितीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ७:०५ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मा. सभापती पंचायत समिती सोयगाव मा. श्री. उत्तम महारू चव्हाण यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन करून अभिवादन केले.

कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गटविकास अधिकारी वर्ग-१ मा. श्री. संतोष भालेराव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. महेंद्रसिंग कुमारसिंग पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. आनंद गणपतराव पैठणे तसेच प्र. सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. अशोक दौड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास आणि विकासाचा आढावा घेत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन सभापती उत्तम महारु चव्हाण यांनी केले. तसेच प्रशासनातील पारदर्शकता, लोकाभिमुख कामकाज आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले आणि राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा सोयगाव परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार