छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या राष्ट्रगीताने नांदा तांडा येथे स्वातंत्र्य दिन सोहळ्याला रंगत
नांदा तांडा : ग्रुप ग्रामपंचायत नांदा तांडा-नांदगाव येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वरदानसिंग चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक चव्हाण सर, शिक्षकवृंद,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष जयप्रकाश भाऊ चव्हाण, माजी सरपंच मोरसिंग चव्हाण, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राठोड, ग्रामविकास अधिकारी प्रदीप पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय शिक्षक, विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गावात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.






