Home / Uncategorized / देवीचंदसिंह बारवाल यांची करणी सेनाची चौथ्यांदा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती…

देवीचंदसिंह बारवाल यांची करणी सेनाची चौथ्यांदा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत :

समाज व राष्ट्रहिताच्या कार्याची दखल; संघटन विस्ताराची जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर;समाजहित आणि राष्ट्रहितासाठी सातत्याने कार्य करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे देवीचंदसिंह बारवाल, छत्रपती संभाजीनगर यांची करणी सेना चौथ्यांदा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कामाची जबाबदारी पाहून करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल ‘अम्मू’ आणि राष्ट्रीय संघटन महामंत्री राखी गर्ग यांच्या हस्ते त्यांना देवीचंद बारवाल यांना नियुक्तीपत्र प्रदान करून ही जबाबदारी सोपविण्यात आली.

करणी सेनेच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठविणे, सामाजिक एकोपा मजबूत करणे तसेच राष्ट्रहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणे, या कार्याची दखल घेत देवीचंदसिंह बारवाल यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाच्या संघटन विस्ताराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात करणी सेनेचे संघटन अधिक सक्षम व व्यापक करण्यासाठी बारवाल यांनी सर्व करणी सैनिकांना सोबत घेऊन प्रभावीपणे कार्य करावे. राज्यातील विविध जिल्हे, तालुके आणि ग्रामीण भागात संघटनेची बांधणी करून नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

राष्ट्रीय संघटन महामंत्री राखी गर्ग यांनी देवीचंदसिंह बारवाल यांच्यावर विश्वास व्यक्त करताना, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात करणी सेनेचे संघटन अधिक मजबूत आणि संघटित होईल, असा विश्वास व्यक्त केला. समाज व राष्ट्रहिताच्या विविध उपक्रमांना गती देत संघटनेला राज्यभरात व्यापक स्वरूप देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल ‘अम्मू’ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात करणी सेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असून, सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे भूमिका मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर देवीचंदसिंह बारवाल यांनी करणी सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेची प्रभावी बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व समाजबांधव, पदाधिकारी आणि करणी सैनिकांना सोबत घेऊन संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील करणी सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बारवाल यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचा विस्तार आणि संघटनात्मक बांधणीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियुक्तीबद्दल देवीचंदसिंह बारवाल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार