छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी – श्रीपत पवार
खादगाव ता. पैठण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखेचे उद्घाटन बुधवारी उत्साहात पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमात शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. युवक तालुकाध्यक्षपदी उल्हास नवगिरे, शाखाध्यक्षपदी विक्रम नवगिरे, उपाध्यक्षपदी देवराज नवगिरे, सचिवपदी रमेश नवगिरे, कोषाध्यक्षपदी संदीप गायकवाड, सल्लागारपदी पप्पू गायकवाड तसेच खजिनदारपदी मच्छिंद्र नवगिरे यांची निवड करण्यात आली.
या उद्घाटन कार्यक्रमास मिलिंद शेळके, दिलीप पाडमुख, बाळकृष्ण इंगळे, राकेश पंडित, कृष्णा वावळ आदी उपस्थित होते.





