Home / Uncategorized / जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

जिल्हा परिषद सदस्य डॉ. माहिन मुलतानी यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थ्यांची घोषणाबाजी करत प्रभातफेरी

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. माहिन इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास सोयगाव पंचायत समितीच्या सभापती मिराबाई उत्तम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहणानंतर संस्थाध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते, सचिव सौ. रत्नाताई पंजाबराव कोलते पाटील तसेच उपस्थित संचालक मंडळ आणि संस्था प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून देशभक्तीपर घोषणा देत प्रभातफेरी काढली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी सावळदबारा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण सरकटे व प्रा. जीवन कोलते पाटील यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यवीरांचे योगदान तसेच देशाप्रती असलेली आपली जबाबदारी यावर मनोगत व्यक्त केले.

विद्यालयाचे प्राचार्य जीवन कोलते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य हे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नसून देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्ये जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा तसेच देशाचा विकास साधावा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिक्षक विकास पाटील, भास्कर खमाठ, मुकुंदा व्यवहारे, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, भूषण देसले, दिलीप सिसोदे, मनोहर पडोळं, गणेश मोहने, सुनील चव्हाण, दिलीप कोळी, डॉ. प्रवीण सरकटे, गणेश सत्रे, योगेश राठोड, प्रदीप पाटील, राहुल बडक, मोहन बोरे, सतीश खवले, शिवाजी सत्रे, अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, गजानन चव्हाण, संदीप कोलते, अंकुश कोलते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणारा ठरला. अशी माहिती अमोल कोलते पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार