छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा; सागर गोसावी यांच्या हस्ते थोरात यांचा सत्कार
बारागाव पिंपरी येथे एस. आर. थोरात दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
सिन्नर;बारागाव पिंपरी : येथील श्रीकृष्ण दूध संकलन केंद्रास मा. श्री. पृथ्वीराज आबासाहेब थोरात (एस. आर. थोरात दूध संघ) यांनी शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी दूध संकलन केंद्राच्या कामकाजाची पाहणी करून दूध उत्पादक, संकलन केंद्र चालक तसेच परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
या सदिच्छा भेटीप्रसंगी सागर दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते मा. श्री. पृथ्वीराज थोरात यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दूध व्यवसायाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दूध उत्पादकांना योग्य दर, दूध संकलनाची प्रक्रिया, गुणवत्तेची तपासणी तसेच दूध व्यवसायासमोरील विविध अडचणी याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा झाली.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असून, दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून दूध उत्पादकांना नियमित बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दूध उत्पादकांच्या हितासाठी सहकार्याची भूमिका ठेवून दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी मा. श्री. हरीश बोंबले साहेब, सार्थक गोसावी, दत्तात्रय रामचंद्र गोसावी (सामाजिक कार्यकर्ते) तसेच परिसरातील नागरिक, दूध उत्पादक व मान्यवर उपस्थित होते. भेटीमुळे परिसरातील दूध उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
बारागाव पिंपरी येथील श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राच्या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी पृथ्वीराज थोरात यांचे स्वागत करून दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा केली.





