Home / Uncategorized / एकदिवसीय क्रीडा विषयक कार्यशाळा २०२६ उत्साहात संपन्न*डॉ रणजीत पाटील यांची माहिती…

एकदिवसीय क्रीडा विषयक कार्यशाळा २०२६ उत्साहात संपन्न*डॉ रणजीत पाटील यांची माहिती…

जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

जळगाव;खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव व मुळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई. सोसायटीतील शालेय व महाविद्यालयीन क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षकांसाठी तसेच बी.पी.एड. आणि एम.पी.एड. विद्यार्थ्यांकरिता आयोजित *“एकदिवसीय क्रीडा विषयक कार्यशाळा २०२६”* उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रणवचंद्र जंगले, मा. सह-सचिव, के.सी.ई. सोसायटी व्यवस्थापन संचालक मंडळ होते. प्रमुख उपस्थितींमध्ये डॉ. अशोक राणे, मा. सदस्य, व्यवस्थापन मंडळ, के.सी.ई. सोसायटी, डॉ. केतन नारखेडे, प्र.प्राचार्य एम. जे. कॉलेज, डॉ. केतन चौधरी, प्राचार्य, व्ही.पी.होले कॉलेज ऑफ एज्युकेशन एन्ड फिजिकल एज्युकेशन, सौ. सुषमा कांची, मुख्याध्यापक, ओरीऑन सी.बी.एस.ई. स्कूल, श्री. सचिन निकम, मा. क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, किशोर चौधरी तसेच के.सी.ई. सोसायटीतील विविध शैक्षणिक संस्थांचे क्रीडा अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील व डॉ. रणजीत पाटील यांनी केले तसेच प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे बीजभाषण के.सी.ई. सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे मा. सदस्य डॉ. अशोक राणे यांनी केले. सकाळ सत्रातील अध्यक्षीय मनोगत के.सी.ई. सोसायटी व्यवस्थापन संचालक मंडळाचे सह सचिव मा. ॲड. प्रणवचंद्र जंगले यांनी मांडले. कार्यशाळेत श्री. सचिन निकम, मा. क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशासकीय अधिकारी, एकलव्य क्रीडा संकुल यांनी क्रीडा व्यवस्थापन व क्रीडा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात श्री. राजेश जाधव, मा. सचिव, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स संघटना तसेच डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांची व्याख्याने झाली. या सत्रांमधून क्रीडा क्षेत्रातील नियोजन, व्यवस्थापन, प्रशिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक बाबींवर उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले. समारोप सत्रात नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिलीप दिघे, के.सी.ई.सोसायटीच्या एकेडमीक डायरेक्टर डॉ. मृणालिनी फडणीस उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे यांनी उपस्थित क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांना मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये क्रीडेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. के.सी.ई. सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलामध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा केवळ के.सी.ई. सोसायटीच्या विद्यार्थ्यांपुरत्याच मर्यादित न राहता परिसरातील तसेच बाहेरील विद्यार्थ्यांनाही त्यांचा लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्रीडा क्षेत्रात जळगावची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी क्रीडा सुविधा, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सहभाग या तिन्ही बाबींचा समन्वय आवश्यक आहे. एकलव्य क्रीडा संकुलामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या या दर्जेदार क्रीडा सुविधांचा लाभ घेत भविष्यात एखादा विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू म्हणून घडावा आणि त्याने भारतात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स अथवा ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षाही के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे यांनी यावेळी व्यक्त केली योग्य व प्रभावी वापर करून अधिकाधिक गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेमुळे संस्थेतील क्रीडा संचालक, शिक्षक व प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातील अद्ययावत माहिती, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्रीडा विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेस के.सी.ई. सोसायटीतील विविध शाळा व महाविद्यालयांतील क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्ही.पी.होले कॉलेज ऑफ एज्युकेशन एन्ड फिजिकल एज्युकेशन चे विभागप्रमुख प्रा. प्रणव बेलोरकर व त्यांचा स्टाफ तसेच एकलव्य क्रीडा संकुल कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यशाळा एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी तसेच एम. जे. कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार