Home / Uncategorized / जालिंधर बुधवत यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड; ॲड.जयश्री शेळके यांच्या हस्ते सत्कार…

जालिंधर बुधवत यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड; ॲड.जयश्री शेळके यांच्या हस्ते सत्कार…

बुलढाणा : प्रतिनिधी 

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदावर बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

 

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेतृत्व करताना जालिंधर बुधवत यांनी बाजार समितीच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत तिचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. त्यांच्या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट झाली असून, शेतकरी बांधवांच्या हिताला त्यांनी सातत्याने प्राधान्य दिले आहे.

जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी झालेली त्यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या कार्याची आणि सहकार क्षेत्रातील योगदानाची पावती असल्याचे ॲड.जयश्री शेळके यांनी यावेळी सांगितले. “त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा निश्चितच शेतकरी बांधवांना फायदा होईल. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, जिल्हा समन्वयक गजाननभाऊ धांडे, शहर प्रमुख विजयभाऊ राऊत उपशहर प्रमुख सुनीलभाऊ भाग्यवंत, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिक्षाताई पिंपळे, बुलढाणा तालुकाप्रमुख अनुश्रीताई जाधव, उपतालुकाप्रमुख विजयाताई पाटील, अनिताताई गायकवाड, सुनंदाताई खरात,रत्नाताई शेळके, मनोजभाऊ चंदन,निलेशभाऊ हरकल, रफिकशेठ, सचिनभाऊ परांडे, समाधानभाऊ मुजमुले, पृथ्वीभाऊ राजपूत, श्रीकांतभाऊ जाधव, गणेशभाऊ पालकर, निलेशभाऊ पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार