Home / Uncategorized / मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचवीस वर्षाची प्रतीक्षा संपणार गोद्री–पळसखेडा–टिटवी–सावळदबारा रस्त्याचे काम सुरू होणार”..

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचवीस वर्षाची प्रतीक्षा संपणार गोद्री–पळसखेडा–टिटवी–सावळदबारा रस्त्याचे काम सुरू होणार”..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील टिटवी पळसखेडा ते फर्दापूर रस्ता सुमारे तीन महिन्यांपूर्वी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी,पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य राहुल राठोड यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. भावी सभापती तथा युवा नेते राहुल राठोड यांनी पाहणी केली होती

 

गेल्या सुमारे २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोद्री–पळसखेडा–टिटवी–सावळदबारा या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानंतर संबंधित विभागांनी कार्यवाही सुरू केली आहे. वन विभागाकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.

या रस्त्यामुळे सावळदबारा परिसरातील बारा खेड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः जामठी व परिसरातील सर्व नागरिकांना सावळदबारा मार्गे संभाजीनगर, बुलढाणा जाण्यासाठी सध्या फत्तेपूर–देऊळगाव–गुजरी मार्गे तब्बल ४० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करावा लागतो. प्रस्तावित रस्ता पूर्ण झाल्यानंतर हे अंतर लक्षणीयरीत्या कमी होऊन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

गोद्री ते पळसखेडा हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने वन विभागाची मंजुरी मिळण्यात अनेक वर्षे अडथळे येत होते. या रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांनी सातत्याने लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करत होते. अनेकदा भूमिपूजन व उद्घाटन झाले, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. नुकतीच वन विभागाची मंजुरी मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे या बहुप्रतीक्षित रस्त्याचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या रस्त्याच्या निर्मितीमुळे संपूर्ण सावळदबारा परिसराच्या विकासाला नवी चालना मिळणार असून, वाहतूक, शिक्षण, आरोग्य व आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आम्ही लोकांना ह्याच रस्त्यांची कामाची आश्वासन दिलेली होती

त्या अनुषंगाने या कामाकरता वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करण्या करता

मंत्री गिरीशजी महाजन साहेब,मंत्री अतुलजी सावे साहेब,माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब,रामेश्वर नाईक, या सर्व नेते मंडळींनी मदत केली त्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी,जिल्हा परिषद सदस्य माहीम मुलतानी,सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण,पंचायत समिती सदस्य राहुल राठोड यांच्यावतीने सर्वांचे खूप खूप आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार