Home / Uncategorized / अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने पुण्यात भव्य ब्राम्हण मेळावा संपन्न ..!

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने पुण्यात भव्य ब्राम्हण मेळावा संपन्न ..!

 

पुणे : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ यांच्या वतीने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे भव्य दिव्य ब्राम्हण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष निखिलजी लातूरकर तसेच राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा मोहिनी ताई पत्की यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील प्रतीक्षा ताई कुलकर्णी यांना नियुक्ती पत्र देऊन “बुलढाणा जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष” पदाची जबाबदारी देण्यात आली.

या भव्य कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री मोहनजी दाते (दाते पंचांग), श्रीमती सुनीता ताई चितळे (चितळे उद्योग समूह), श्री देवराजजी धर्मावत (धर्मावत समूह), प्रशांतजी दामले (सिने अभिनेते) तसेच श्री परीक्षित प्रभू देसाई (व्हाइस चेअरमन, पितांबरी कंपनी) यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी, महंत श्री सुधीर दास महाराज (काळाराम मंदिर, नाशिक) तसेच गौरी कानिटकर (अनुरूप विवाह संस्था) यांची विशेष उपस्थिती लाभली.

समाज एकजूट, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा मेळावा उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार