छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता.०३
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ओळख वैजापूरकराना व्हावी म्हणून सकल मातंग समाज जयंती उत्सव समितीने डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबरी,पोवाडे ,शाहिरी व अन्य पुस्तकांच्या मुखपृष्ठाचे फोटो काढून हे साहित्य चित्ररथा द्वारे ट्रॅक्टर वर मागे लावून शनिवार रोजी सायंकाळी अण्णाभाऊसाठे नगर येथून मिरवणूक काढली, वैजापूरकर याना अण्णाभाऊ साठे यांच्या सहित्याची ओळख व जाणीव करून दिली.”आधी नमन माझे शिवराया”असे वाक्य लिहून छत्रपती शिवाजी महाराज,लहुजी वस्ताद,व डॉ,बाबासाहेब आंबेडकर, व लेखणी हाती घेऊन साहित्य लिहित असलेले अण्णाभाऊ साठे हे चित्र वैजापूर करांच्या मनी भावले. या साहित्य चित्र प्रदर्शनी रथाचे उदघाटन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व जेष्ठ साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी श्रीफळ वाहून केले. सर्वांचे लक्ष अण्णाभाऊंच्या साहित्य कृती कडे वेधणारी ही मिरवणूक वैजापूर इतिहासात पहिलीच आहे,असे उदगार मराठवाडा विभागाचे जेष्ठ बालसाहित्यिक व लेखक धोंडीरामसिंह राजपूत यांनी या प्रसंगी व्यक्त करून अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सर्वश्री राहूल कारभारी त्रिभुवन,देवदास त्रिभुवन, संकेत त्रिभुवन, तुषार त्रिभुवन, सागर त्रिभुवन,सोनू त्रिभुवन,प्रवीण त्रिभुवन, रोहित त्रिभुवन, देवा त्रिभुवन, आदित्य त्रिभुवन, अविनाश सोळसे,श्री, खुडे,या सर्वांचे अभिनंदन करून सत्कार केला.
(फोटो कॅप्शन- डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य चित्र प्रदर्शनी रथ सोबत उत्सव समिती सदस्य व साहित्यिक ठा. धोंडीरामसिह राजपूत)






