Home / Uncategorized / भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी विशाल रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती..

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी विशाल रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

युवा शक्तीच्या बळावर पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर पूर्व (उत्तर) जिल्हा कार्यकारिणीत सोयगाव तालुक्यातील रवळा-जवळा येथील युवा कार्यकर्ते विशाल रामचंद्र शिंदे यांची जिल्हा चिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सोयगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यमंत्री दर्जा प्राप्त झालेले तथा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषी एकनाथ नरवडे यांनी नियुक्तीपत्र देऊन विशाल शिंदे यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. या नियुक्तीवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. सुहास त्रिंबकराव शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.

नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराजजी महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी विशाल शिंदे यांनी कार्य करावे, जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना भारतीय जनता पार्टीशी जोडावे तसेच पक्षश्रेष्ठींकडून सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि वेळेत पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

विशाल शिंदे हे सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागात भाजप युवा मोर्चाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल विशाल रामचंद्र शिंदे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच राजपूत समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रसार करत युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी व पक्षसंघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने कार्य करू, अशी भावना वडील रामचंद्र शिंदे,विशाल शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार