Home / Uncategorized / अखिल भारतीय समता परिषद मानोरा शहराध्यक्षपदी भाविक चतुरकर, तालुकाध्यक्षपदी गजानन भवानी यांची नियुक्ती..

अखिल भारतीय समता परिषद मानोरा शहराध्यक्षपदी भाविक चतुरकर, तालुकाध्यक्षपदी गजानन भवानी यांची नियुक्ती..

मानोरा | प्रतिनिधी – सुधीर ढगे

अखिल भारतीय समता परिषद या संघटनेच्या वतीने मानोरा शहराध्यक्षपदी श्री भाविक चतुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तालुकाध्यक्षपदी श्री गजानन रावजी भवानी यांची निवड करण्यात आली.

कोडोली (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील रहिवासी असलेले भाविक चतुरकर यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी भुजबळ साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास तालुक्यातील अनेक समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बहुजन समाजाच्या हितासाठी तसेच सामाजिक कार्यात दोघांकडून चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच समाजाच्या वतीने भाविक चतुरकर व गजानन भवानी यांचा सत्कार करून त्यांना आशीर्वाद देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार